कोळा विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न.

सांगोला तालुक्यातील कोळा विद्या मंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आज विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठया थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी कै. बापूसाहेब झपके व कै. बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्रीकांत लांडगे सर, मुख्याध्यापक विनोद देशमुख सर, पर्यवेक्षक र. ज. मणेरी सर, वैद्यकीय अधिकारी रविकांत जांभळे साहेब, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन विलासराव देशमुख, माजी प्राचार्य नारायण विसापूरे सर, वि. वा. पोरे सर, शिवाजी कोळेकर, मा. वा. कोळेकर सर, एल. वाय. देशमुख सर, पत्रकार रवीकांत शेटे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी इंग्लिश मिडीयम स्कूल मधील मुलांनी रिमिक्स गाणी, लावणी, कोळी गिते, महाराष्ट्रीयन गाणी, कॉमेडी सॉंग आदी सादर केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती सरगर सर, तृप्ती काटे मॅडम, महानंदा बुरुगुले मॅडम, अस्मिता माळी मॅडम यांनी केले.