रस्ता सुरक्षेच्या प्रभावी प्रचार प्रसारासाठी रस्ता सुरक्षा रथ

सांगोला:- रस्ता सुरक्षा अभियानादरम्यान रस्ता सुरक्षेच्या प्रभावी प्रचार प्रसारासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनात आणि बंडगर मोटर ड्रायव्हिंग स्कूल, सांगोला यांच्या सौजन्याने रस्ता सुरक्षा रथ तयार करण्यात आला. सदर रथ मोटार वाहन निरीक्षक संदीप पाटील यांनी मार्गस्थ केला. सांगोला तालुक्यातील वाढती अपघात संख्या लक्षात घेऊन प्रभावी जनजागृतीद्वारे अपघात कमी करण्यासाठी हा रथ मदत करणार आहे
सदर रस्ता सुरक्षा रथावर विविध रस्ता सुरक्षा संदेश प्रदर्शित करण्यात आले आहेत. तसेच ध्वनिक्षेपकाद्वारे वारंवार रस्ता सुरक्षा सूत्री उद्घोषित करण्यात येणार आहे . तरी तालुक्यातील नागरिकांनी आपल्या भागात हा रथ आल्यानंतर त्याद्वारे दिलेल्या सूचनांचे वाहन चालविताना काटेकोरपणे पालन करावी व अपघात टाळावेत असे आवाहन मोटर वाहन निरीक्षक संदीप पाटील यांनी याप्रसंगी केले.
सदर रथ मार्गस्थ करताना बंडगर मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक दगडू बंडगर , कल्याणी मोटर ड्राइविंग स्कूलचे जयेश घाडगे , उबाळे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे पांडुरंग उबाळे, साई पीयुसी सेंटरचे बंडू इंगोले, करीम भाई तांबोळी, निसार इनामदार, फारूक आतार माणिक. महामुनी, प्रदीप शिंदे कृष्णा बंडगर, इरफान आतार, अक्षय जाधव आदींची उपस्थिती होती .