उत्कर्ष माध्यमिक विद्यालयातील चार विद्यार्थ्यांची बुद्धिबळ स्पर्धेत, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड 

दिनांक 1/ 8/2024 रोजी क्रीडा संकुलन सांगोला येथे पार पडलेल्या सांगोला तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धेत  उत्कर्ष विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.

17 वर्षीय मुली गट – कु. देशपांडे स्वरश्री सचिन (सांगोला तालुका- प्रथम क्रमांक ), 14 वर्षीय मुली गट – कु.जावीर वैष्णवी अशोक (तृतीय क्रमांक ), कु. काशीद मानसी सूर्यकांत (पाचवा क्रमांक), 14 वर्षीय मुले गट -चि.सपताळ तन्मय सतीश(तृतीय क्रमांक)

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक श्री.सचिन गोतसूर्य सर, रवि कुंभार सर  यांचे संस्थाध्यक्षा मा.संजीवनीताई केळकर, माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर, पर्यवेक्षक श्री भोसले सर, पर्यवेक्षक मुक्तानंद मिसाळ सर,  प्राथमिक विभागाच्या  मुख्याध्यापिका मागाडे मॅडम, पर्यवेक्षिका  कुलकर्णी मॅडम यांनी  कौतुक केले. व त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button