सांगोला(प्रतिनिधी):- अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 22 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला असल्याची घटना सांगोला शहरातील बुंजकर वस्तीजवळ 1 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजणेचे सुमारास घडली.
अपघातामध्ये स्वप्नील भारत लवटे (रा.मेडशिंगी, वय 22 वर्षे) याचा दुर्देवी अंत झाला असून अपघाताची फिर्याद पोपट लवटे रा.मेडशिंगी ता.सांगोला यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे. आकस्मित मयत म्हणून सांगोला पोलीस स्टेशनला नोंद झाली असून पुढील तपास पोहेकॉ.घोडसे हे करीत आहेत.