सांगोला तालुक्यातील अजनाळे गावाबाबत मोठी बातमी

सांगोला:-टी बी मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत अजनाळे गावास पुरस्कार मिळाला. सदर पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले आहे.
टी बी मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत सांगोला तालुक्यातील अजनाळे गांवस जिल्ह्य़ातील प्रथम दहा गांवस पुरस्कार मा. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, यांचे हस्ते तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅक्टर संतोष नवले जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅक्टर मीनाक्षी बनसोडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, यांचे उपस्थित देण्यात आला आहे
पुरस्कार सोहळ्यात अजनाळे गांवाचे सरपंच,उपसरपंच सदस्य ग्रामसेवक ,आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका,आरोग्य साहाय्यीका, आशाताई, मदतनीस गटप्रवर्तक, वैद्यकीय अधिकारी, व पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मिलिंद सावंत ऊपस्थित होते