सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांनी चोऱ्या-घरफोड्यांचे सत्रच सुरू केले असून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, वाहने यासह संसारोपयोगी साहित्यावर डल्ला मारला आहे. पोलिसांची गस्त सुरू असतानाही चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने खाकी वर्दीचा धाक कमी होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेतून होत असल्याने चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान सांगोला पोलिसांपुढे उभे राहिले आहे.
सांगोला शहरासह ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. शहर व तालुक्यात चोऱ्या, घरफोडी, दुचाकी चोरी, जनावरांच्या चोऱ्या अशा घटनांत वाढ झाली असून रविवारच्या आठवडा बाजारात मोबाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. चोरांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले असल्याने चोर शिरजोर तर हतबल पोलीस अशी सांगोला तालुक्याची अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. आतापर्यंत नोंद झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास गतीने व्हावा अशी मागणी जनतेतून होत आहे.
तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून जनावरे चोरी, घरफोड्या करणाऱ्या टोळीने सळो की पळो करून सोडले आहे. आठवडा बाजारात मोबाईल चोरणाऱ्या टोळीने तर धुमाकूळ घातला आहे. शेकडो मोबाईल चोरी झाल्याने नागरिकांनी या मोबाईल चोरांचा मोठा धसका घेतला आहे. जनावरांच्या चोऱ्या, शेळ्यांची चोरी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरी या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तालुक्यात चोरट्यांनी दहशत माजवली असून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्या, घरफोड्या करून चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला असून पोलिसांचा धाक कमी होतोय का? असा प्रश्न निर्माण झाला असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान सांगोला पोलिसांमुळे उभे राहिले आहे.
Back to top button