महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण पुणे अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दिनांक 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताह राज्यभर साजरा करण्यात आला .जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनोनी येथे पहिल्या दिवसापासून ते सात दिवस विविध उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्लॅटफॉर्म तयार करून दिला.
पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य , विद्यार्थ्याकडून भितीपत्रके, शैक्षणिक साहित्य प्रदर्शन, हस्तलिखित प्रदर्शन ,फ्लॅशबोर्ड ,प्रतिकृती ,तरंगचित्र विद्यार्थिनी तयार केले .दुसऱ्या दिवशी गणितीय परिपाठाने सुरुवात होऊन गणित तंत्राची माहिती, गणितीय कोडी व खेळ दिवसभर घेण्यात आले. तिसऱ्या दिवशी क्रीडा परिपाठ ,देशी खेळाचे महत्व ,खेळ व व्यायाम घेण्यात आले .
सप्ताहाचे चौथ्या दिवशी पारंपारिक वेशभूषा , देशाची सांस्कृतिक परंपरा ,लावणी नृत्य, पथनाट्य ,कथाकथन, कोळी नृत्य ,गायन आणि एकांकिका सादर करण्यात आल्या. पाचव्या दिवशी मातीकाम, बांबूकाम कार्यशाळा घेण्यात आल्या .कागदी मुखवटे, कापडी पिशव्या विविध वस्तू बनवणे प्रात्यक्षिके करून दाखवली .मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .वृक्ष संवर्धनासाठी मुलांची व पालकांची जबाबदारीचे नेमकी काय आहे जाणीव करून दिली .
शेवटच्या दिवशी विद्यांजली नोंदणी ,स्वयंसेवकाची नावे प्रसिद्धी केली गावात प्रभात फेरी काढून जनजागृती केली पोस्टर मेकिंग घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. सप्ताह अंतर्गत विविध उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी जुनोनी ग्रामपंचायत उपसरपंच सुनीता पाटील मॅडम शिक्षण विस्तार अधिकारी अमोल भंडारी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांनी भेट देऊन घेतलेले उपक्रमांचे कौतुक केले.
गावातील प्रतिष्ठित व दानशूर व्यक्तीने गावात मुलांना स्वादिष्ट व रुचकर जेवणासाठी देणगी व इतर किराणामाल शाळेसाठी पुरवले व साडेतीनशे मुलांना उत्कृष्ट पद्धतीचे जेवणाचे नियोजन केले. मुलांच्या स्वादिष्ट भोजणासाठी सरपंच सौ मनीषा पाटील मॅडम मा.राजेंद्र पाटील ,शिक्षणप्रेमी दिलीप गडदे ,समाधान बुरंगले ,रामचंद्र माने ,भागवत वाघमोडे पोपट तडे साहेब शिवाजी व्हनमाने सेवानिवृत्ती गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण जेवणासाठीचा खर्च आणि वस्तू पुरवल्या गेल्या.
शिक्षण सप्ताहाचे समारोप कार्यक्रम दिवशी राजेंद्र पाटील श्री संजय तडे नाना श्री समाधान कांबळे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सचिन पाटील, उपाध्यक्ष प्रवीण तवटे उपस्थित होते. मान्यवरांनी मनोगता मध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण काळाची गरज आणि भविष्यातील जबाबदाऱ्या याची जाणीव करून दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री विकास वाघमारे सर यांनी सप्ताहामध्ये घेतलेल्या विविध उपक्रमांच. परिचय करून दिला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . शिक्षण सप्ताह नियोजन आणि कार्यवाही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती विजया पाटील मॅडम श्रीमती बगले मॅडम श्री परसराम भोसले सर सौ मंदाकिनी घाडगे मॅडम श्रीमती परविन मुलानी मॅडम श्रीमती जिजाबाई घेरडे मॅडम श्री आनंद बामणे सर श्रीमती मुरुमकर मॅडम श्रीसमाधान केंगार सर श्री आप्पासाहेब मिसाळ सर श्रीमती संगीता बाबर मॅडम यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.