सांगोला – सांगोला तालुक्यातील भोपसेवाडी जवळ कोल्हाचा मृत्यू झाला आहे मात्र नेमका कशामुळे कोल्हाचा मृत्यू झाला हे मात्र समजू शकले नाही. सदर घटनेची माहिती सांगोला वन विभागाला देवूनही ‘ ना वन अधिकारी फिरकला, ना वनरक्षक फिरकला ‘ त्यामुळे हा कसला वनविभाग अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहेत.
डिकसळ येथील पशुधन पर्यवेक्षक नाना हालगंडे हे शुक्रवार २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ च्या सुमारास सांगोल्याकडून दुचाकीवरून डिकसळ गावाकडे निघाले होते.वाटेत जवळा -भोपसेवाडी रोड लगत सामाजिक वनीकरण विभागाचे कंत्राटी वनमजूर रस्त्याच्या कडेला थांबल्याचे पाहून नाना हालगंडे यांनी त्यांच्याकडे विचारणा केली असता,त्यांनी कोल्हा मृत अवस्थेत पडल्याचे त्यांना सांगितले.
या घटनेची माहिती हालगंडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांना दिली असता,त्यांनी वनरक्षक मुंडे यांना घटनास्थळी पाठवतो असे म्हणाले, त्यानंतर बराच वेळ झाला तरी ना वनरक्षक फिरकला ना वनमजूर फिरकला नाही. शेवटी कंत्राटी वनमजूर कोरे व गावडे यांनी त्या ठिकाणी येऊन कोल्ह्याचा मृतदेह उचलून जवळा म्हसोबाच्या डोंगराजवळ वन कार्यक्षेत्रात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.
Back to top button