कोळा (जगदीश कुलकर्णी ):-सांगोला तालुक्यातील कोळे गावापासून १२ कि.मी. अंतरावर वसलेले तीर्थक्षेत्र शुक्राचार्य हे ठिकाण आहे. श्रावण अधिक महिन्यात प्रत्येक सोमवारी भाविक भक्तांची गर्दी होत असते. डोंगर कपारीत वसलेल्या शुक्राचार्य मंदिर श्रावण महिन्यात लक्ष वेधून घेत आहे.
श्री.क्षेत्र शुक्राचार्य हे एक पवित्र स्थान असून या ठिकाणी अधिक मासात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. सध्या पुरुषोत्तम मासानिमित्त भव्यदिव्य श्रीमद् भागवत कथा व महायज्ञ हा कार्यक्रम मठाधिपती तपोनिधी कल्याणगिरी ऊर्फ भास्करगिरी गुरू दिलीप गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने केला जातो. तसेच दररोज सकाळी महाराजांच्या हस्ते पूजा करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे..

शुक्राचार्य मंदिरात अधिक मासामुळे दुपारच्या सत्रात भाविकांनी दर्शनासाठी सोलापूर, सांगोला, सांगली, सातारा या भागातील ‘भाविक मोठ्या संख्येने येतात. हा परिसर भाविकांच्या गर्दीने गजबजून जातो. श्रीक्षेत्र शुक्राचार्य हे खानापूर, आटपाडी तालुक्याच्या सीमेवर आहे. हे तीर्थक्षेत्र हिवतड गावाच्या हद्दीत आहे. शुकमुनींच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. मंदिराचे मुख्य ठिकाण हे आटपाडी तालुक्यातील हिवतड गावच्या हद्दीत आहे, तर डोंगराच्या वरच्या भागात गणपती मंदिर असून खानापूर तालुक्यात आहे. हे ठिकाण डोंगराच्या कडेकपारीत आहे. तिन्ही बाजूंनी डोंगराच्या रांगा आहेत. डोंगराच्या दऱ्या-खोऱ्यात मोठ्या प्रमाणात झाडी आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिरवळ दिसून येते, तर पाण्याचे झरेही वाहत असतात.
घनदाट झाडी असल्याने या ठिकाणी -पक्ष्यांची गर्दी असते. पक्ष्यांचा पशु-प किलबिलाट मोठ्या प्रमाणात असतो. राष्ट्रीय पक्षी मोरांचेही अस्तित्व अधिक आहे. तसेच श्रावण महिना सुरू झाल्यानंतर महिनाभर या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील शाळांच्या सहली मोठ्या प्रमाणात येत असतात. सध्या अधिक महिना असल्यामुळे येथे दररोज गर्दी व भाविकांचा ओढा सुरू आहे. या ठिकाणी विक्रेते मोठ्या संख्येने येऊन आपली दुकाने थाटत असतात. भाविकांची दर्शनासाठी या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे श्री शुक्राचार्यांचे एक प्राचीन जागृत देवस्थान आहे. शुक्राचार्य हे एक महान योगी होते. त्यांचे तपहरण करण्यासाठी इंद्राने रंभा नावाची अप्सरा पाठविली. परंतु शुक्राचार्य हे ब्रम्हचारी असल्याने स्त्रीचे दर्शन नको म्हणून ते डोंगरात अदृश्य झाले. त्या ठिकाणी त्यांचे देवालय पूर्वाभिमुखी आहे. नदीपलीकडे श्री भुवनेश्वरीचे सुंदर देवालय आहे. देवीची मूर्ती काळ्या दगडाची असून सुंदर आहे. एक जुनी शिल्पकला म्हणून देवळावरील गोपूर पाहण्यासारखे आहेत…
Back to top button