फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. गुरु पौर्णिमा महर्षी वेदव्यास यांच्या सन्मानार्थ साजरी केली जाते. प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरू असतोच माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर क्षणाक्षणाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण नेहमी काहीतरी शिकत असतो अशा असंख्य गुरूंना शतशः नमन करण्यासाठी फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज मध्ये गुरुपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, ए.ओ. वर्षा कोळेकर, सुपरवायझर वनिता बाबर यांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. इयत्ता तिसरीतील तन्मय वाघमोडे, इयत्ता चौथीतील प्रणव टाकळे, सातवीतील सानवी बाबर यांनी गुरुंविषयी आदर व भावना व्यक्त केल्या. यानंतर प्रशालेतील शिक्षक दयानंद चांडोले यांनी गुरुपौर्णिमेबद्दल माहीती सांगितली. यानंतर विद्यार्थ्यांनी प्रशालेतील शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.प्रियांका मोहिते यांनी मानले.या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फॅबटेक संस्थेचे चेअरमन माननीय श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे , शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.



