महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिरमध्ये माजी विद्यार्थी नूतन सीए रैय्यान मणेरी यांचा सत्कार संपन्न*

सांगोला ( प्रतिनिधी): सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी नूतन सीए रैय्यान जिलानी मणेरी यांचा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म.शं.घोंगडे यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद उपप्राचार्य प्रा.प्रकाश म्हमाणे,पर्यवेक्षक सुरेश मस्तुद,मच्छिंद्र इंगोले उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात सीए रैय्यान मणेरी म्हणाले, चार्टर्ड अकौटट पदवी नोकरी व व्यवसाय या दोन्हीही क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणारा सर्वव्यापी असा हा अभ्यासक्रम आहे.परीक्षा पध्दती ही त्रिस्तरीय असते. योग्य शिक्षण, ज्ञान, प्रशिक्षण, कौशल्ये आत्मसात केल्यास आपणाला आत्मविश्वासाने आयुष्यात उभे राहता येते. चार्टर्ड अकौटटसना लेखापरीक्षण, हिशेब तयार करणे, सल्ला सेवा,कर सल्ला, संगणक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, नोकरी अशा विविध संधी उपलब्ध होतात. प्रथमपासूनच मेहनत, योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन या चतु: सूत्रीच्या आधाराने विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण करता येत असल्याचे सांगत शाळा व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे यश प्राप्त झाल्याचे आपल्या मनोगतात सांगितले.

यावेळी उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद आपल्या मनोगतात म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील पदवी अभ्यासक्रमांनतर विविध संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी स्वप्ने पाहावीत ती साध्य करण्यासाठी प्रयत्नपूर्वक कौशल्ये आत्मसात करावीत. त्यासाठी जुन्या मानसिकतेतून बाहेर पडून नव्या जगाचे ज्ञान आत्मसात करायला हवे, त्यासाठी स्वतःला आत्मनिर्भर करणारी स्वप्ने पाहावीत असे सांगत सीए रैय्यान मणेरी कडून आपण सर्वांनी नक्की प्रेरणा घेऊन शैक्षणिक वाटचाल करावी असे सांगितले.

सदर कार्यक्रमास ज्युनिअर कॉलेज मधील प्रा.नवनाथ बंडगर,प्रा.सुवर्णा लवटे,प्रा.सुहास काळेल,शिक्षकेतर कर्मचारी व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपप्राचार्य प्रा. प्रकाश म्हमाणे, सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र कुंभार यांनी केले तर प्रा. प्रसाद खडतरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button