भारतीय डाक कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध संपन्न झाली. यामध्ये श्री एस एस होवाळ, श्री अर्जुन कोळी, श्री सोमनाथ कोरके, श्री हरीश हाके व देवा शिंदे हे पंढरपूर विभागातुन बिनविरोध संचालक झाले आहेत.तर श्री जे आर नरुटे हे सोलापूर विभागातून संचालक झाले आहेत.
तसेच श्री सोमनाथ कोरके यांची भारतीय डाक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर सौ वैशाली नरुटे यांची व्हॉइस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या सर्वांचे एफ एन पी ओ परिवाराकडून अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची माहिती सचिव शिवाजी तोंडले यांनी दिली.