शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील प्रथम पालक सभा नुकतीच संपन्न झाली. या प्रशालेतील बरेचसे विद्यार्थी जुने आहेत ,त्यात आणखी काही नवीन विद्यार्थ्यांची भर पडली आहे.या सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीचा आढावा पालकांना कळावा तसेच मंथन,स्कॉलरशिप यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी लहानपणापासूनच व्हावी. याचे मार्गदर्शन करण्यासाठी ही पालक सभा आयोजित केली होती. सभेसाठी केजी पासून इयत्ता पाचवी पर्यंतचे वर्गाचे सर्व पालकांना आमंत्रित केले होते.
सदर सभेला पालकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला.पालकांना आपल्या पाल्याच्या शिक्षणाबाबत तसेच इतर काही मूलभूत गोष्टीच्या अडचणी असतील तर सांगण्यासाठी आवाहन केले. पाल्यांच्या शैक्षणिक अडचणी निश्चित सोडवू असे आश्वासन केजी ते सातवीच्या पर्यवेक्षिका सौ सुषमा ढेबे, तसेच सहशिक्षक श्री अनिल गेजगे यांनी दिले.
सर्वच पालकांनी काही अडचणी नाहीत असे सांगितले.सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांकडे बारकाईने वैयक्तिक लक्ष देत आहेत,असे कौतुक पालकांकडून ऐकायला मिळाले.काही नवीन पालक आले आहेत त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की ,आम्ही लक्ष्मीदेवी विद्यामंदिरचे नाव ऐकून होतो. शिस्तीच्या बाबतीत तसेच शिक्षणाबरोबर इतरही सर्वच उपक्रमात ही नावाजलेल्या शाळांपैकी एक शाळा आहे. याची प्रचिती आम्हाला या दोन महिन्यात आली.प्रशालेचे कामकाज असेच प्रगतीच्या दिशेने व्हावे.यासाठी पालकांनी शुभेच्छा दिल्या.शिक्षण घेताना विद्यार्थी,पालक आणि शिक्षक तिन्ही घटक महत्त्वाचे आहेत.पालक म्हणून आम्ही सुद्धा मुले घरी आल्यानंतर ,त्यांना दिलेला गृहपाठ पूर्ण करून घेऊ असे आश्वासन पालकांनी दिले.
कॉलेजचे प्राचार्य हेमंत आदलिंगे यांनी पालकांना मार्गदर्शन केले.चांगल्या सवयी विद्यार्थ्यांमध्ये कशा रुजवता येतील. याकडे आमचे कटाक्षाने लक्ष आहे.शैक्षणिक ज्ञानाबरोबरच,विद्यार्थ्याला एक आदर्श नागरीक बनण्यासाठी आम्ही नेहमीच पालकांच्या सूचनेचा आदर करु.स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थी टिकेल नव्हे तर तो यशाची उंच शिखरे गाठून स्वतःचा,पालकांचा व पर्यायाने शालेचा नावलौकिक वाढवेल.या पालक सभेस पर्यवेक्षक श्री सुभाष आसबे सर उपस्थित होते.
शेवटी चहापान झाल्यानंतर आभार प्रदर्शनाने पालक सभेची सांगता झाली.