नाझरेमठ ते नाझरे गाव रस्त्याची मोठी दुरावस्था झाली असून, बोराटे मळा येथे रस्ता पूर्ण खचल्याने मोठमोठे खड्डे पडल्याने खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हेच समजेना.
बोराटे मळा येथे रस्त्यावरच मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकाला याचा अंदाज न आल्याने अनेकांचे अपघात झाले आहेत. त्यातच दोन वाहने समोरासमोर एकाच वेळेस खड्ड्याजवळ आल्याने मार्ग काढण्यासाठी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.सदर च्या खोल खड्ड्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे तरी खड्डा बुजवून त्वरित रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी वाहनधारकातून होत आहे तरी याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.