श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेचा, सेवेचा मास, संपूर्ण देशभरात या महिन्यांमध्ये भगवान शिवाची पूजाअर्चा, आराधना, अभिषेक, जप, उपवास यासारख्या सेवा भक्ती भवानी शिवभक्तांकडून पार पडतात व याचाच एक भाग म्हणून महादेव मंदिर ते नाझरे गावात श्रावण मासानिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉक्टर पद्म भास्कर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महास्वामीजी दिंडी सोहळ्यात सहभागी झाल्याने शिवभक्ताचा आनंद गगनात मावेनासा झाला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की, उभा कसा राहिला विटेवरी पांडुरंगा या मनमोहक महास्वामींच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. यावेळी रविराज स्वामी, नंदकुमार रायचूरे, गणेश चव्हाण, बाळासो स्वामी, जयपाल गुरव, नामदेव बनसोडे, भारत पाटील, सुरेश रेड्डी, मंगल पाटील, शरद स्वामी, माने, शंकर स्वामी, सोमनाथ स्वामी व बालवर्ग इत्यादीने सहभाग घेऊन दिंडी सोहळ्यात आनंद निर्माण केला.