शिवणे माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये “संविधान दिन साजरा”

शिवणे वार्ताहर-26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो .त्याचे औचित्य साधून विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य विजयकुमार वाघमोडे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले होते .
सुरवातीला सर्व विध्यार्थी व शिक्षकांनी संविधान उद्देशपत्रिका वाचून संविधान वाचविण्याची शपथ घेतली.त्यानंतर
प्रा.राजाभाऊ कोळवले यांनी संविधान(राज्यघटना)कशी तयार करण्यात आली हे सांगताना घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कसा अभ्यास केला?कसे परिश्रम घेतले?याबद्दल सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य विजयकुमार वाघमोडे म्हणाले की,संविधान म्हणजे कायद्याचे एकत्रीकरण डॉ, बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नाने तयार झालेल्या या घटनेमुळे गेली70 वर्षे आपला देश चालविला जात आहे त्याचे पावित्र्य आपण मरेपर्यंत राखले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन व संविधान उद्देशपत्रिका वाचन प्रा.शोभनतारा मेटकरी यांनी केले तर आभार यशवंत नरळे यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.