महाराष्ट्र
ग्रामपंचायत शिवणे येथे अमृत महोत्सव भारतीय संविधनास 75 वर्षे पूर्ण झाल्याने संविधान दिन साजरा

दिनांक 26/ 11/ 24 रोजी ग्रामपंचायत शिवणे येथे अमृत महोत्सव भारतीय संविधनास 75 वर्षे पूर्ण झाल्याने संविदान दिन साजरा केला आहे सन 24-25 पासून “घर घर संविधान” कार्यक्रम साजरा करणे बाबत शासनाने परिपत्रक काढले असून दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपण संविधान स्वीकृत करून 26 जानेवारी 1950 पासून संविधनाची अंमलबजावणी सुरू झाली. संविधनाचे महत्त्व अनेक स्तरावर असून भारतीय संविधनात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, घडवण्याचा मार्ग दाखविला आहे असे पंचायत समिती विस्तार अधिकारी आरोग्य मिलिंद सावंत यांनी सांगितले
संविधान दिनाचे कार्यक्रमास “घर घर संविधान” बाबत महत्त्व सांगून उद्देशिकाची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी शिवणे ग्रामपंचायतचे सरपंच दादासो जनार्दन घाडगे, उपसरपंच उदयसिंह वसंत घाडगे, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत देवराव पुकळे, विस्ताराधिकारी आरोग्य मिलिंद सावंत, पंचायत अधिकारी महेश लंगोटे, आरोग्य सेवक राहुल देवडकर, आरोग्य सेविका राणी ठाकूर, कृषी सेवक सतीश चव्हाण ,आशा सेविका महादेवी वाळके, ग्रामपंचायत लिपिक नागेश बनसोडे, योजना दूत विजय कोळेकर, ग्रामपंचायत शिवणेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते



