सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सुरुवातीला संविधानाचे निर्माते डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज चे प्राचार्य प्रा.केशव माने यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तानाजी सूर्यगंध सर,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज चे उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,पर्यवेक्षक दशरथ जाधव सर,पर्यवेक्षक तात्यासाहेब इमडे सर,माणिकराव देशमुख सर तसेच प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे तानाजी सूर्यगंध सर म्हणाले की, दरवर्षी देशात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. संविधानाने आपल्या अनेक हक्क दिले आहेत ज्यामुळे आपण संपूर्ण स्वातंत्र्य आणि समानतेने जीवन जगतो. देशातील नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांबद्दल आदराची भावना वाढवणे हा संविधान दिनाचा मूळ उद्देश आहे.२०१५ मध्ये भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. २०१५ हे वर्ष यासाठी विशेष ठरले कारण त्या वर्षी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करण्यात आली. तेव्हापासून, संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख स्मिता इंगोले मॅडम यांनी केले तर शेवटी आभार श्रीरंग बंडगर सर यांनी मानले.