शहीद दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 129 रक्तदात्यांचे उत्स्फूर्तपणे रक्तदान.

सांगोला शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या शहीद अशोक कामटे संघटनेतर्फे शहीद दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना आदरांजली अर्पण केली.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.किर्तीकुमार शिंदे, पोलिस निरीक्षक भिमराव खणदाले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग गव्हाणे , मा. नगराध्यक्ष नवनाथ पवार ,गिरिशभाऊ नष्टे, मा.नगरसेवक आनंदभाऊ माने , गजानन बनकर ,विलास पाटील सर, नवनाथ शिंदे सर, डीसीसीचे चव्हान, एचडीफसी बँकेचे कांबळे साहेब,माधव शिंदे सर,तसेच दादासो खडतरे, रमेश फुले,उत्तम काका चौगुले,आदर्श शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, सुप्रिया बेले,आशाताई सलगर, शालन शिंदे, प्रमिला जगदाळे अरविंदनाना केदार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सांगोला तालुका माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते. या सर्व सदस्यांनी संघटनेच्या कार्याचे कौतुक करून संघटनेला भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी मनोगत व्यक्त करताना तहसीलदार कणसे साहेब यांनी संघटनेच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा उल्लेख करत संघटनेच्या कार्याचे कौतुक केले तसेच संघटनेने सलग सोळा वर्षे राबवलेल्या या रक्तदान शिबिराचे देखील आवर्जून उल्लेख केला व संघटना वेळोवेळी नागरी समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत असते त्याचा देखील आवर्जून उल्लेख केला. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे संबंधीच्या समस्या सोडण्यासाठी संघटनेने घेतलेली आक्रमक भूमिका तसेच सांगोला परिसरामध्ये नागरिकांना नगरपालिकेच्या संबंधित येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संघटनेचे असलेली भूमिका या भूमिकांचं स्वागत करत संघटनेच्या कार्याचा गौरव केला व संघटनेचे कार्य खरोखरच इतर सामाजिक संघटनांसाठी एक आदर्शवत कार्य असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.
सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत या रक्तदान शिबिरामध्ये विविध मान्यवरांनी भेट देऊन संघटनेच्या या कार्यासाठी उद्योजक रमेश फुले, संभाजी ब्रिगेडचे राज्याचे नेते अरविंद केदार, संगोला नगरपालिकेच्या नगरसेविका अनुराधा खडतरे, राजलक्ष्मी शिंदे, शिवांजली शिंदे , माजी नगरसेवक किशोर बनसोडे, दीपकराव बनसोडे,मुकुंद हजारे, मयुर ढोले, शारिक तांबोळी, विशाल नलवडे, तेजस कुरकुटे,गणेश पाटोळे,अँड. सचिन ढेरे हे मान्यवर उपस्थित होते.
सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाची सांगता शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली यावेळी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलकंठ शिंदे सर आभार प्रदर्शन चारूदत्त खडतारे यांनी मानले सूत्रसंचालन प्रसाद खडतरे सर यांनी केले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठलपंत शिंदे सर,मकरंद पाटील,तोसिफ शेख, सुयोग बनसोडे,संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
– – – – – – – – –
सांगोल्याचा एक जबाबदार तहसीलदार म्हणून संघटनेच्या सामजिक, विधायक उपक्रमास वेळोवेळी आवश्यक मदत करणार व शासनाचा जबाबदार प्रतिनिधी म्हणून सदैव सहकार्य करणार असल्याची मनोगतात आवरजून सांगीतले. संघटना ज्या सामाजिक मागण्या, समस्या मांडतात त्या सकारात्मक शासनापर्यंत पोहचवून पुर्ण करणार.
संतोष कणसे
तहसीलदार, सांगोला



