सावे माध्यमिक विद्यालयात गुरुवार दिनांक 10/7/ 2025 रोजी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन अभिवादन केले.
तसेच विद्यालयातील सहशिक्षक श्री. बर्गे सर, श्री मेटकरी सर, श्री गावडे सर यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. आज महर्षी व्यास यांचा जन्मदिवस हा संपूर्ण देशभर गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. गुरुर्ब्रह्मा ,गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मैश्री गुरवे नमः याप्रमाणे आपले गुरु आपणास वंदनीय असतात. गुरुमुळेच आपणास चांगले संस्कार, ज्ञान मिळते असे मनोगतातून सांगितले.
विद्यार्थी मनोगातून ज्योती कांबळे, वैष्णवी नलवडे, अस्मिता शेळके, संतोष गडदे, सानिका शेळके, ऋतुजा वाघमारे, कल्याण माने, सुजल गावडे, दीपक गावडे, शुभम गावडे, साक्षी गावडे, वैष्णवी शेजाळ, नम्रता माने, मयुरी माने, ओंकार शेळके, अंकिता स्वामी, शंभू वाघमारे, जान्हवी जाधव इत्यादी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गुरुचे महत्त्व सांगितले. यामध्ये प्राचीन काळापासून गुरुबद्दल आदर व सन्मान करण्यात येतो. आपणास गुरु हे ज्ञानाचा प्रकाश दाखवतात म्हणूनच आपणाला जीवनामध्ये यश मिळते. आपण उंच शिखरावरती पोहोचतो असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. शेळके सर यांनीही गुरुपौर्णिमेचे महत्त्व विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणे देऊन सांगितले. सदर कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. शेळके सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.