सांगोला तालुकाआरोग्यमहाराष्ट्रराजकीय

डॉ.अनिकेत देशमुख यांना मेडिकल क्षेत्रातील इंटरनॅशनल पुरस्कार प्रदान

सांगोला(प्रतिनिधी):-स्व.भाई गणपतराव देशमुख यांचे नातू, शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ.अनिकेत देशमुख यांना वर्ल्ड हेल्थ वेलनेस काँग्रेस या जागतिक संस्थेच्यावतीने दिला जाणारा बेस्ट इन्कलास फॉर ऑर्थोपेडिक केअर हा मेडिकल क्षेत्रातील इंटरनॅशनल पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

सदर पुरस्काराचे वितरण मुंबई येथील ताज हॉटेल मध्ये शुक्रवार दि.16 फेब्रुवारी रोजी मलेशियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ कोह कर चई यांच्या हस्ते उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात करण्यात आला.

सामाजिक कार्य तसेच वैद्यकीय क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन 2024 चा दिला जाणारा मेडिकल क्षेत्रातील इंटरनॅशनल पुरस्कार डॉ.अनिकेत देशमुख यांना मिळालेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. डॉ.अनिकेत देशमुख हे सध्या वैद्यकीय सेवेबरोबरच स्व.भाई.गणपतराव देशमुख यांचा वारसा सक्षमपणे पुढे चालवित आहेत.

सदरचा पुरस्कार हा माझा नसून स्व.आबासाहेबांवर प्रेम करणार्‍या जनतेचा आहे. पुरस्कारामुळे अधिक चांगली रुग्णसेवा, समाजसेवा करण्यासाठीऊर्जा मिळाली असल्याचे डॉ.अनिकेत देशमुख यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!