सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

सांगोला विद्यामंदिरच्या दोन विद्यार्थिनींना क्यूब रूट्स फाउंडेशन शिष्यवृत्ती

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील आशा अनिल बुरांडे अकरावी कला अ व मानसी मधुकर सुरवसे अकरावी शास्त्र ब या दोन गुणवंत विद्यार्थिनींना क्यूब रूट्स फाउंडेशन नॅशनल हायवे भारत सरकारची प्रत्येकी दहा हजार रुपये शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
सोलापूर – मंगळवेढा,बोरगाव – वाटंबरे प्रा.लि. तर्फे इंचगाव ता.मोहोळ येथे गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण सोहळ्यामध्ये
  क्यूब रूट फाउंडेशन प्रोजेक्ट हेड आडाबाला भास्कर सत्यनारायण यांचे शुभहस्ते हस्ते व क्यूब रूट फाउंडेशन हायवे रोड सेफ्टी हेड अनुज म्हेत्रे , सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे प्रा.सुरेश टकले,पालक अनिल बुरांडे, मधुकर सुरवसे यांचे उपस्थितीत प्रशस्तीपत्र व शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्यात आली.
या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य,सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज  प्राचार्य गंगाधर घोंगडे,उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी  या गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!