विनोद माणसाला दुखः विसरायला लावतो – प्रा. विश्वनाथ गायकवाड

सांगोला/ प्रतिनिधी : आजच्या स्पर्धेच्या युगात ताणतणावामुळे माणसाचं जगण दुखःमय होत
आहे. विनोदामुळे मानवी जीवन सुंदर होते. जीवनातील विसंगती मधून विनोदाची निर्मिती होत असते, हा विनोद माणसाला दुखः विसरायला लावतो असे मत कथाकार प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी व्यक्त केले.
येथील सांगोला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक प्रसंगी प्रमुख पाहुणे
म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष
बाबुराव गायकवाड हे होते.
यावेळी संस्था उपाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, सचिव म.सि.झिरपे, संस्था
सदस्य सुरेश फुले, विश्वनाथ चव्हाण, गिरजाप्पा कोरे, मल्लिकार्जुन घोंगडे, शामराव लांडगे,
प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले कार्याध्यक्ष डॉ.आर.जी खानापुरे उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालाच्या “ प्रेरणा व गॅलक्सी ” या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रा.डॉ.आर.आर.टेंभुर्णे आणि डॉ.बबन गायकवाड यांनी भित्तीपत्रकाचे संयोजन केले. यावेळी
आयोजित करण्यात आलेल्या शेलापागोटे कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली. या
“शेलापागोटे” कार्यक्रमाचे संयोजक प्रा.वासुदेव वलेकर, प्रा.एस.ए.शहा यांनी केले. रांगोळी स्पर्धेचे
संयोजन डॉ.विद्या जाधव यांनी केले. वक्तृत्त्व स्पर्धेचे संयोजन प्रा.संतोष लोंढे यांनी केले
निंबंधस्पर्धेचे संयोजन डॉ.मालोजी जगताप यांनी केले विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे संयोजन
सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.संतोष लोंढे यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमास विदयार्थी मोठया
संख्येने उपस्थित होते. परीक्षक म्हणून डॉ.विधीन कांबळे, डॉ.विजयकुमार गाडेकर, डॉ.नवनाथ
शिंदे, कु.मृणाल राऊत, शुभांगी कवठेकर, सौ.रुपश्री भोसले, सौ.अपर्णा कांबळे, सौ.वनिता पाटील,
सौ.मालन शिंदे उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी केले.
पाहुणे परिचय डॉ.आर.जी पवार यांनी केला. प्रा.पी.सी.झपके यांनी मनोगत व्यक्त केले. अहवाल
वाचन कार्याध्यक्ष डॉ.आर.जी खानापुरे, डॉ.विजयकुमार गाडेकर, प्रा.प्रसाद लोखंडे यांनी केले.
यावेळी गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला.
आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष लोंढे यांनी मानले. सूत्र संचालन
प्रा.विशाल कुलकर्णी,कु.शेजल कवठेकर,प्रा.प्रसाद लोखंडे यांनी केले यावेळी संस्थेचे सर्व सदस्य,
हितचिंतक, सेवानिवृत्त प्राध्यापक, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी
मोठ्या संख्याने उपस्थित होते.