विद्यार्थ्यांनी आई-बापाच्या कष्टाची जाणीव ठेवल्यास यश निश्चित – डॉ.सुरेश शिंदे

सांगोला/ प्रतिनिधी /प्रेम हे मानवी जीवनात निसर्गात येत असते, महाविद्यालयीन जीवनात प्रेम हा विषय महत्वाचा असतो हे आपल्या कवितांचा संदर्भ देत स्पष्ट करून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या जेष्ठ पिढीविषयी आदर ठेवावा. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये शिकत असताना शेतात राबणाऱ्या आपल्या आई-बापाच्या कष्टाची जाणीव ठेवल्यास यश निश्चित मिळेल असे मत सुप्रसिद्ध जेष्ठ कवी डॉ.सुरेश शिंदे यांनी व्यक्त केले .
येथील सांगोला महाविद्यालयाच्या ४५ व्या वर्धापनदिन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते
बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबुराव
गायकवाड हे होते. यावेळी सचिव म.सि.झिरपे, संस्था सदस्य सुरेश फुले, सोमनाथ
ढोले(गुरुजी),साहेबराव ढेकळे,सुधीर उकळे, आप्पासाहेब लेंडवे,शामराव लांडगे,प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश
भोसले कार्याध्यक्ष डॉ.आर.जी खानापुरे उपस्थित होते.
यावेळी कवी शिंदे म्हणाले , “जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली, पण
माणसाच्या सृष्टीला जगविण्यासाठी भाकर नावच रसायन लागत ते पिकवण्याच काम आपला
शेतकरी बाप करतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे. प्रत्येकाने शेतकरी असल्याचा अभिमान
बाळगून माता आणि मातीचा सन्मान केला पाहिजे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी
केले.पाहुणे परिचय डॉ.आर.जी पवार यांनी केला.अहवाल वाचन कार्याध्यक्ष डॉ.आर.जी खानापुरे यांनी
केले. यावेळी गुणवंत विद्यार्थी ,प्राध्यापक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला. यावेळी इतिहास विभागाचे वतीने संपादित केलेल्या “ वारसा आणि शाश्वत विकास
विकास: संधी आणि आव्हाने” या डॉ. सदाशिव देवकर, डॉ. विलास वाहणे, डॉ. महेश घाडगे यांनी
संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आभार प्रा.संतोष लोंढे यांनी मानले. सूत्र
संचालन प्रा.विशाल कुलकर्णी यांनी केले यावेळी संस्थेचे सर्व सदस्य, हितचिंतक , सेवानिवृत्त
प्राध्यापक ,सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्याने उपस्थित
होते.
——————————-
दुष्काळात ज्ञानाचा सुकाळ निर्माण करणार सांगोला महाविद्यालय
१९७२ च्या दुष्काळाने मराठी माणसाला भानावर आणले.माणदेश हा तर कायम दुष्काळी भाग.
इथला माणूस जगण्याच्या लढाईमध्ये कधीच हरत नाही.दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना ज्ञान
देण्याचे काम हे महाविद्यालय करत आहे. आज या महाविद्यालयात विविध भागातील विद्यार्थी
उत्तम दर्जाचे शिक्षण घेत आहेत,या महाविद्यालाचे विद्यार्थी विद्यापीठ आणि राज्य पातळीवर
चमकत आहेत, अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत,शिक्षण
समाजकारण राजकारण अर्थकारण या जीवनाच्या क्षेत्रात ही विद्यार्थी यशस्वी आहेत ही आनंदाची
बाब आहे.यामुळे या महाविद्यालयाचे काम हे दुष्काळात ज्ञानाचा सुकाळ निर्माण करणारे
वाटते.