बाळकृष्ण माऊली मंदिरात दर नवमीला होते कीर्तनसेवा व अन्नदान

नंदेश्वर ता मंगळवेढा येथील श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मंदिरात प्रत्येक महिन्याच्या शुध्द नवमीला सकाळी ठिक सात वाजता पूजा,दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी व सायंकाळी सात ते नऊ कीर्तनसेवा व त्यानंतर अन्नदानाचे आयोजन श्री समर्थ सद्गुरु बाळकृष्ण महाराज अध्यात्म मंदिर व देवसागर साधक ट्रस्टकडून करण्यात येते.
या नवमीसाठी गावातील व परगावहुन माऊली भक्तगण अंदाजे तीनशे ते चारशे नंदेश्वर येथील बाळकृष्ण माऊली मंदिरात येत असतात तसेच परगावहून आलेल्या माऊली भक्तांची मंदिर समितीकडून निवासाची मोफत सोय करण्यात येते.
दर महिन्याच्या कीर्तनसेवेच्या माध्यमातून नंदेश्वरमध्ये काही अंशी युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी झालेले दिसते व यातून अध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल सुरू असल्याचे पहावयास मिळते.दिंनाक १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठिक सात वाजता नामवंत महाराजांची किर्तन सेवा होणार असून त्यानंतर अन्नदान होणार आहे.