sangolacrimemaharashtra
पंढरपूरकडे निघालेल्या वारकर्यांना चारचाकी वाहनांची पाठीमागून धडक; एका वारकर्याचा दुर्देवी अंत तर 5 वारकरी जखमी
सांगोला (प्रतिनिधी):- पंढरपूर कडे विठ्ठल दर्शनाकरता निघालेल्या वारकर्यांच्या दिंडीत पाठीमागील बाजुने येणार्या वाहनाने पायी वारीतील लोकाना पाठीमागुन ठोकर दिल्याने एका वारकर्याचा दुर्देवी अंत झाला असल्याची घटना काळुबाळुवाडी ता.सांगोला येथील हॉटेलसमोर 15 फेबु्रवारी 2024 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातामध्ये ज्ञानु पाटील (वय 52 वर्षे) यांचा मृत्यू झाला असून बाळु पुजारी, प्रतिभा पाटील, महादेवी तेली, सिमा सुतार (सर्व रा.म्हसोबा हिरणी ता.हुकेरी जि, बेळगाव राज्य कर्नाटक) व शेजारील गाव येथील अशोक ताधले (रा.कोननकेरी) आदी 5 जण जखमी झाले आहेत. अपघाताची फिर्याद वसंत आप्पा पाटील (रा.म्हसोबा हिरणी ता.हुकेरी जि.बेळगाव राज्य कर्नाटक) यांनी दिली असून पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.
म्हसोबा हिरणी ता.हुकेरी येथील 34 महिला व पुरुष असे दि.01 फेब्रुवारी 2024 रोजी पंढरपुर येथील विठ्ठल दर्शनकरिता पायी वारीकरिता निघाले होते. काल 15 फेब्रुवारी रोजी दिंडीतील सर्व वारकरी घोरपडेवाडी ता.कवठेमहांकाळ जि.सांगली येथुन सकाळी अंदाजे 04.30 वाजणेचे सुमारास पायी वारीकरता, सांगोल्याच्या दिशेने रवाना झाले होते. सर्व पायी वारकरी हे काळुबाळूवाडी ता. सांगोला जि.सोलापुर येथील हॉटेलच्या समोर सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पोहचले होते. पायी वारीमध्ये गावातील इसम ज्ञानू पाटील हे सगळ्यात मागच्या बाजुला बॅटरी घेवुन त्याचे उजेडाला पाठीमागुन येणारे वाहनाना सावध करित होते, त्याचे पुढील बाजुस गावातील इतर पायी वारकरी चालत होते. त्याच दरम्यान धडकण्याचा मोठा आवाज झाला.
त्यावेळी ज्ञानु पाटील, फिर्यादी यांच्या पत्नी प्रतिभा, बाळु पुजारी, अशोक ताधले, महादेवी तेली, सिमा सुतार असे जमिनीवर जखमी अवस्थेत कोसळलेले दिसले. व समोर काही अंतरावर चारचाकी वाहन थांबल्यासारखे झाले, व पुन्हा निघुन गेले तेव्हा लक्षात आले की, चारचाकी वाहनाने पायी वारीतील वारकर्यांना धडक देवुन निघुन गेले आहेत. त्यावेळी तात्काळ आजुबाजुस संपर्क करुन रुग्णवाहीकेला बोलविले व जखमींना सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारास दाखल केले. उपचार करित असताना जखमी मधील ज्ञानु पाटील यांना पुढील उपचाराकरिता पंढरपुर येथे रवाना करण्यात आले. सर्व जखमीवरती उपचार चालु असताना सकाळी 10 वा. चे सुमारास पंढरपुर येथे उपचारा करता पाठविण्यात आलेले ज्ञानु पाटील हे मयत झाल्याची खात्री झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अनोळखी वाहनावरील अनोळखी वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.