श्री.संग्रामसिंह साहेबराव पाटील हे सेट परीक्षेत उत्तीर्ण.

जवळे (प्रशांत चव्हाण) जवळे गावचे सुपुत्र व सध्या भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूल विटा ता.खानापूर जिल्हा सांगली मधील मराठी विषयाचे अध्यापन करणारे सहाय्यक शिक्षक श्री.संग्रामसिंह साहेबराव पाटील हे अत्यंत खडतर व अथक परिश्रमातून विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत मराठी विषयातून उच्चांकी गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत.
श्री.संग्रामसिंह पाटील हे जवळे गावचे माजी सरपंच व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती श्री.साहेबराव दादा पाटील यांचे चिरंजीव आहेत. सेट परीक्षेचा निकाल 5 ऑगस्ट रोजी जाहीर झाला. त्यांनी मिळवलेल्या सदरच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच जवळे ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



