न्यू इंग्लिश स्कूल मध्ये नूतन संस्था अध्यक्ष डॉ.अनिकेत देशमुख यांचा सत्कार संपन्न

सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला च्या संस्था अध्यक्षपदी डॉक्टर अनिकेत देशमुख यांची निवड झाल्याबद्दल या शिक्षण संकुलातील सर्व शिक्षकांमार्फत सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याचबरोबर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त शिक्षकांचाही सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांच्या शुभहस्ते नूतन संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य प्रा नामदेव कोळेकर व ज्येष्ठ शिक्षक नीलकंठ लिंगे यांचा सेवानिवृत्ती निमित्त नूतन संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख व संस्था सचिव माननीय विठ्ठलराव शिंदे सर यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संस्था सदस्य बबनराव जानकर, प्रा. डॉ.अशोकराव शिंदे, प्रा दीपक खटकाळे, प्रा जयंत जानकर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे प्राचार्य प्रा. केशव माने, उपमुख्याध्यापक प्रा संजय शिंगाडे, उपप्राचार्य प्रा संतोष जाधव, पर्यवेक्षक श्री तानाजी सूर्य गंध श्री दशरथ जाधव श्री तातोबा इमडे सर, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपले मनोगत मध्ये  नूतन संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख यांनी शिक्षक एक उत्तम पिढी बनवू शकतो,  सुसंस्कारित विद्यार्थी घडवून समाजामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार करू शकतात. इथून पुढील काळामध्ये या संस्थेमध्ये जास्तीत जास्त वेळ देणार असल्याचे सांगितले. 

यावेळी  संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर यांनी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला या संस्थेची स्थापना तालुक्यातील गोरगरीब, सर्वसामान्य, कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे या हेतूने, स्व. डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या प्रेरणेने झाली. या वेलरुपी शिक्षण संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले असून  आज या संस्थेमध्ये पाच हजारहून अधिक विद्यार्थी शिकत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. सौ.जुलेखा मुलाणी मॅडम व प्रा संतोष राजगुरू यांनी केले तर आभार संस्कृतिक विभाग प्रमुख प्रा मिलिंद पवार यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button