नाझरे येथे डॉक्टर भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून डॉक्टर भाई गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे ता. सांगोला येथे भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन शेकाप चे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी माजी उपसभापती सुनील चौगुले, शिक्षक नेते अशोक पाटील, सरपंच संजय सरगर, उपसरपंच सौ सुवर्णा पाटील, माजी सरपंच हनुमंत सरगर, शामराव आप्पा वाघमारे, सोसायटी चेअरमन सुनील बनसोडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 64 रक्तदात्यांनी रक्तदान केले.