महूद, ता. ८ : राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसकरवस्ती(महूद) या शाळेचा विद्यार्थी सिद्धार्थ संतोष गोसावी याने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती कला अकादमी या संस्थेच्या वतीने लोकमान्य टिळक जयंती निमित्ताने ही राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील इयत्ता तिसरी- चौथीच्या गटामध्ये सिद्धार्थ गोसावी याने लोकमान्य टिळकांचे बालपण या विषयावर निबंध लेखन केले होते. त्याचा राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक आला आहे.त्याला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. सिद्धार्थ गोसावी याच्या यशाबद्दल शाळेच्या वतीने त्याचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. त्याला वंदना पाटणे व वर्गशिक्षक विठ्ठल तांबवे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक धुळा सातपुते उमेश महाजन यांचे सह शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व ग्रामस्थांनी सिद्धार्थ गोसावी याचे अभिनंदन केले आहे.
फोटो ओळ – महूद : अंतर्गत असलेल्या केसकरवस्ती येथील प्राथमिक शाळेच्या सिद्धार्थ गोसावी याचा राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्याबद्दल सत्कार करताना वंदना पाट