महूद, ता.८ : महूद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसकरवस्ती या शाळेच्या अन्विता गणेश निकम हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
महूद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकत्याच या स्पर्धा संपन्न झाल्या.इयत्ता पहिली दुसरीच्या गटात केसकरवस्ती शाळेची अन्विता निकम ही प्रथम आली. तर याच गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी या शाळेचा विद्यार्थी दक्ष घाडगे उत्तेजनार्थ प्रथम आला आहे. तसेच राजवर्धन लवटे यानेही यश मिळवले आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या शिवतेज वाघमोडे, वेदिका जाधव,श्री बंडगर,माऊली सावंत,सैफ शेख,आर्यन डोंगरे,विवेक डोंगरे,सिद्धार्थ गोसावी या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना वंदना पाटणे,उमेश महाजन, विठ्ठल तांबवे, धुळा सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना विकास संस्थेच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.