नाझरा ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती साजरी

नाझरा(वार्ताहर):- नाझरा ग्रामपंचायत व शिवप्रेमी ग्रुपच्या वतीने नाझरा ग्रामपंचायतीच्या समोर शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रतिमेचे पूजन संजय सरगर,प्रा. विजय गोडसे. ग्रामसेवक के.डी.कदम,विजय भुसारी,दादा निंबाळकर, पोलीस पाटील लखन बनसोडे व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
नाझरा विद्यामंदिर प्रशालेत पर्यवेक्षक मधुकर धायगुडे व विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे व कै. बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील,दिलीप सरगर,वसंत गोडसे, चंद्रशेखर लिगाडे, सोमनाथ सपाटे, दिलावर नदाफ यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्रीधर कन्या प्रशाला व ज्यु. कॉलेज नाझरा येथे शिवजयंती निमित्त प्रतिमापूजन संपन्न. प्रतिमेचे पूजन नेताजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या यास्मीन मुल्ला, कलाशिक्षक शिवभूषण ढोबळे,सौरभ पाटील व शिक्षकेतर कर्मचारी दत्तात्रय डांगे उपस्थित होते.