सांगोला ( प्रतिनिधी): एखतपूर गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. प्रत्येक गावाचा विकास करणे हा माझा ध्यास असल्याने अधिकाधिक निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, अशी ग्वाही आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
एखतपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा विकास जाधव यांची निवड झाल्याबद्दल आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
एखतपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा विकास जाधव यांची निवड झाल्याबद्दल आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, युवासेना तालुकाप्रमुख दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण नवले, विकास जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, आतापर्यंत एखतपूर गावातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. गावच्या विकासासाठी लोकांनी जागृत असले पाहिजे. एखतपूर गावाच्या विकासासाठी मी आमदार म्हणून कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले.