मानेगाव (प्रतिनिधी) :सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते कै .डॉ.भाई. गणपतराव देशमुख यांच्या 97 व्या. जयंती निमित्त मानेगाव जिल्हा परिषद शाळे मध्ये मुलांना खाऊ वाटप करून जयंती साजरी करण्यात आली .यावेळी प्राध्यापक तानाजी बाबर यांनी आपले विचार व्यक्त करत असताना कै.डॉक्टर भाई गणपतराव देशमुख यांच्या जीवनातील अनेक असे गोष्टी सांगून त्यांच्या कार्याचे माहिती दिली .यावेळी त्यांच्या कार्याची पद्धत व गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांच्या बद्दल असणारी तळमळ व त्यांनी त्यांच्याबद्दल केलेल्या कार्याची माहिती दिली .सध्याच्या चाललेल्या राजकारणाचा विचार करत असताना. कै आबासाहेबां ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एकच व्यक्ती .एकच पक्ष .एकच मतदारसंघ. आणि 55 वर्ष आमदारकी .अशी त्यांची ओळख पूर्ण महाराष्ट्र मध्ये असलेला देव माणूस पुन्हा होणे नाही .गोरगरिबाचा वाली असा होणे नाही. त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त मानेगाव शेतकरी कामगार पक्ष. पुरोगामी युवक संघटना .समस्त ग्रामपंचायत मानेगाव .यांच्याकडून त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून आपले विचार व्यक्त केले.
यावेळी मानेगावच्या सरपंच मा .सौ. ताई माणिक बाबर .व महिला सूतगिरणीच्या व्हा.चेअरमन सौ .वंदना तानाजी बाबर .यांच्या हस्ते मुलांना खाऊचे वाटप केले .सदर कार्यक्रमासाठी मानेगाव ग्रामपंचायतचे उप.सरपंच तुकाराम बाबर( मेजर )सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ बाबर .श्री दत्त डेअरीचे चेअरमन धनाजी बाबर .शशिकांत बाबर. नवनाथ शिंदे .तानाजी बाबर .पुरोगामी युवक संघटनेचे सदस्य जगन्नाथ चंद्रकांत बाबर, मारुती शिवाजी बाबर .भारत पाटील. लालासाहेब बाबर. बाबुराव भजनावळे .तुषार बाबर .मुख्याध्यापक माळी गुरुजी. अंगणवाडी सेविका राणी भजनावळे .मदतनीस मोरे ताई . सुभाष भजनावळे .किरण बाबर . अमोल बाबर माजी ग्रामपंचायत सदस्य अंकुश मंडले शंकर भजनावळे (सर ) शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेचे अनेक कार्यकर्ते व गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते
शेवटी जिल्हा परिषद शाळेचे बाबर गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त करून गावातील व शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले