कोळा विद्यामंदिरमध्ये स्वर्गीय डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त ‘जागर संविधानाचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

कोळा (वार्ताहर): कोळा विद्यामंदिर हायस्कूल व जुनिअर कॉलेज कोळा येथे स्वर्गीय डॉ.गणपतरावजी देशमुख यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त “जागर संविधानाचा” हा कार्यक्रम वक्ते तानाजी सूर्यगंध सर यांचा आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी प्रथम प्रमुख पाहुणे श्री तानाजी सूर्यगंध यांचे स्वागत व सत्कार संपन्न झाला.
“जागर संविधानांचा” या कार्यक्रमांतर्गत संविधानातील अनेक महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांना सांगितले. संविधानाचा इतिहास याविषयी माहिती सांगितली. संविधानामुळे आपण सर्वजण सुरक्षित आहोत. आपल्या भारत देशावर इंग्रजांचे राज्य होते. भारतीय लोकांचे पिळवणूक करणारे कायदे इंग्रज लोक भारतीयांवर लादत असत त्यातून भारतीय लोकांची मुक्तता व्हावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र परिश्रम करून हे संविधान तयार केले.यावेळी संविधानाच्या प्रत्येक कलमा विषयी थोडक्यात माहिती करून दिली तसेच अध्यक्षीय मनोगतातून प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीकांत लांडगे सर यांनी संविधानाचे महत्त्व थोडक्यात समजावून दिले.
या संविधानानुसार आपल्याला आपले हक्क व स्वातंत्र्य मिळालेले आहे हेही सांगितले. या कार्यक्रमावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना कोळा ग्रामस्थांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मारुती सरगर सर यांनी केले व आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाचे सांगता झाली



