इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा नाझरा विद्यामंदिर मध्ये सत्कार

नाझरा(वार्ताहर):- यशकल्याणी सेवाभावी संस्था करमाळा व सोलापूर डिस्ट्रिक्ट इंग्लिश लैंग्वेज टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेमध्ये नाझरा विद्यामंदिर मधील 7 वी, 8 वी तसेच 9 वी, 10 वी गटामध्ये अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत तालुकास्तरावर आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

इयत्ता सातवी व आठवी गटात कुमारी मिसाळ सई आनंदा द्वितीय व कुमारी देशपांडे राही अनुप तृतीय क्रमांक पटकावला आहे तर नववी व दहावी गटात बाबर वैष्णवी शहाजी द्वितीय व गुरव ओम आदिनाथ तृतीय क्रमांक पटकावला आहे.सदर विद्यार्थ्यांना संभाजी सरगर,अतुल बनसोडे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके,प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

सदर विद्यार्थ्यांना यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा व सोलापूर जिल्हा इंग्रजी टीचर्स असोसिएशनच्या वतीने स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.सदर विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान प्रशालेच्या वतीने आज करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button