नाझरे प्रतिनिधी :-क्रांतीज्योती महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटनाचे औचित्य साधून लायन्स क्लब सांगोला व विजयसिंह पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने नाझरे ता. सांगोला येथे मोफत डोळे तपासणी शिबिराचे उद्घाटन मा. प्रांतपाल प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके, सीए उत्तम बनकर व पतसंस्थेचे संस्थापक रामचंद्र बनकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी लायन्स क्लब अध्यक्ष उन्मेश आटपाडीकर, खजिनदार नरेंद्र होनराव, सचिव अजिंक्य झपके, पतसंस्थेचे सल्लागार सौ चैत्रजा बनकर, सौ. सीमा बंडगर, विजय आधाटे, कोंडीबा वाघमारे, डॉक्टर बाळासो धायगुडे, श्रीमती नयना पाटील, डॉक्टर चंद्रकला बाबर, सुनील बनसोडे, अजित अडसूळ, पतसंस्था चेअरमन सौभाग्य श्री बनकर, उप चेअरमन सौ दिपाली बनकर, सीईओ गणेश माळी, संचालिका निलाबाई माळी, सौ सुशीला बनकर, सुरेश मा बनकर, सो मनीषा बनकर, सो अश्विनी बनकर, सौ अंकिता बनकर, सौ राणी बनकर, सौ गीता खडतरे, सौ वैष्णवी शिंदे, सौ मनीषा बनकर, सौ तृप्ती बनकर, शाखाधिकारी तुषार बनकर, पत्रकार रविराज शेटे, मा प्राचार्य टिके वाघमारे, मा केंद्रप्रमुख मच्छिंद्र भोसले, ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते.