सावे माध्यमिक विद्यालयात स्व.आ. डॉ. गणपतराव देशमुख यांना अभिवादन

सावे माध्यमिक विद्यालयात लोकनेते स्वर्गीय आमदार डॉ.भाई गणपतराव देशमुख यांची 97 वी जयंती साजरी करण्यात आली .सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर यांच्या हस्ते सांगोला तालुक्याचे लोकनेते ,विश्वविक्रमवीर, भाग्यविधाते, स्वर्गीय आमदार डॉ.भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक श्री शेळके सर यांनी विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने आबासाहेबांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचे माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षक श्री गावडे सर यांनी केले. त्यानंतर विद्यालयातील कु. वनिता बंडगर,कु.अस्मिता शेळके,कु. सरस्वती शेळके व कल्याण माने यांनी आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले तसेच त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. विद्यालयात दिनांक 8-8- 2024 व 10-8- 2024 या दिवशी विद्यालयात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .सर्व स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. विद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल खालील प्रमाणे आहेत.
1) 100 मीटर धावणे मुले लहान गट -प्रथम क्रमांक सुजित चव्हाण, द्वितीय क्रमांक मधुकर गावडे, तृतीय क्रमांक शंभूराजे कोळी. 2) 100 मीटर धावणे मुले मोठा गट प्रथम क्रमांक वैभव माने, द्वितीय क्रमांक सूर्यकांत पांढरे ,तृतीय क्रमांक राजू वाघमोडे . 3) 100 मीटर धावणे मुली लहान गट प्रथम क्रमांक वैभवी नलवडे, द्वितीय क्रमांक समीक्षा माने, तृतीय क्रमांक अनिता बंडगर. 4) 100 मीटर धावणे मुली मोठा गट प्रथम क्रमांक कु.काजल गडदे, द्वितीय क्रमांक कु. सुप्रिया देवकते, तृतीय क्रमांक कु. गीतांजली माने.
5) स्लो सायकल स्पर्धा मुले- प्रथम क्रमांक आविष्कार शेळके, द्वितीय क्रमांक सूर्यकांत पांढरे, तृतीय क्रमांक वैभव माने. स्लो सायकल स्पर्धा मुली प्रथम क्रमांक काजल गडदे, द्वितीय क्रमांक कुमारी वनिता बंडगर ,तृतीय क्रमांक कुमारी सुप्रिया देवकते .
7) क्रिकेट मुले – इयत्ता दहावी विजयी .8) निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक कु.सुप्रिया देवकते, द्वितीय क्रमांक कुमारी सरस्वती शेळके ,तृतीय क्रमांक वनिता बंडगर.9) चित्रकला स्पर्धा- प्रथम क्रमांक कु. अनिता बंडगर, द्वितीय क्रमांक कु. पूनम बंडगर, तृतीय क्रमांक सानिका शेळके, तृतीय क्रमांक संजीवनी शिंदे.10) हस्ताक्षर स्पर्धा – प्रथम क्रमांक कु. समीक्षा देवकते, द्वितीय क्रमांक कु. माया चव्हाण, तृतीय क्रमांक कु. श्रुती साळुंखे.
11) खो खो मुले लहानगट – इयत्ता आठवी विजयी , खोखो मुले मोठा गट इयत्ता दहावी विजयी ,खोखो मुली लहान गट इयत्ता आठवी विजयी, खो खो मुली मोठा गट इयत्ता दहावी विजयी.14) कबड्डी मुले मोठा गट- इयत्ता दहावी विजयी ,कबड्डी मुली मोठा गट इयत्ता दहावी विजयी.16) वक्तृत्व स्पर्धा प्रथम क्रमांक कु.वनिता बंडगर, व्दितीय क्रमांक कु. अस्मिता शेळके ,तृतीय क्रमांक कु.सरस्वती शेळके, तृतीय क्रमांक कल्याण माने.17) लिंबू चमचा स्पर्धा- प्रथम क्रमांक कु.गौरी मोटे, द्वितीय क्रमांक कु. अनिता बंडगर ,तृतीय क्रमांक कु.सानिका शेळके.18) संगीत खुर्ची – प्रथम क्रमांक कु. संजीवनी शिंदे , मयुरी माने, कु.स्वप्नाली ननवरे, मधुकर गावडे, कल्याण माने.19) गोणीउडी स्पर्धा- प्रथम क्रमांक कल्याण माने,द्वितीय क्रमांक मधुकर गावडे, तृतीय क्रमांक विशाल इमडे.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना खाऊ वाटप करण्यात आला. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.