स्व.आ. डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी साक्षी राहुल झेंडे हिने इयत्ता पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक मिळवला.
तिला सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम पाचशे रुपये बक्षीस म्हणून मिळाले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शिवराज भोसले, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.विजयकुमार जगताप सर यांनी तिचे अभिनंदन केले. तिला प्रशालेतील सहशिक्षक श्री.सुनील लिगाडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तिने मिळविलेल्या यशाबद्दल धायटी ग्रामस्थांमधून तिचे कौतुक होत आहे व अभिनंदन केले जात आहे