सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय माजी आमदार डॉ.गणपतराव देशमुख साहेब यांच्या 97 व्या जयंतीच्या निमित्ताने राज्यस्तरीय पुरुष खुला गट 7 किलो मीटरच्या मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.
या भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सचिन जगताप व श्री.पोपट कोडग, सुबोद करिअर अकॅडमी चे संस्थापक मा. पोलीस उपायुक्त श्री भरत शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. अशोकराव शिंदे सर प्रा. दीपक खटकाळे सर प्रा. जयंत जानकर सर उपप्राचार्य प्रा.संतोष जाधव सर उप मुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे सर उपस्थित होते.
स्वर्गीय मा.आ.डॉ. गणपतराव देशमुख साहेब यांच्या जयंती निमित्त श्रमिक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 10 ऑगस्ट 2024 रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले होते हे स्पर्धेचे सलग 18 वर्ष होते.
या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये एकूण 137 खेळाडूंनी भाग घेऊन आपले कौशल्य प्राणपणास लावले या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून या स्पर्धेमध्ये पहिल्या सहा विजेत्या खेळाडूंना रुपये 7000 , 5000. ,4000 , 3000 , 2000 , 1000 रू.व ट्रॉफी देऊन बक्षीस वितरणाचे प्रमुख पाहुणे डॉ.कृष्णा इंगोले व संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिकेत देशमुख यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास संस्था सचिव श्री. विठ्ठलराव शिंदे सर डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी सर, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य श्री. केशव माने सर व संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक श्री अभिनंदन दीपक सूर्यवंशी सांगली, द्वितीय क्रमांक चैतन्य मुकुंदा रुपनर निमज तालुका कवठेमंकाळ , तिसरा क्रमांक अमोल नानासोर अमोल एकतपुर , चौथा क्रमांक महादेव गजानन कोळेकर कवठेमंहकाळ, पाचवा क्रमांक सुशांत प्रकाश सरगर कोळा, साहवा क्रमांक सुमित अविनाश जावीर सोलापूर
या राज्यस्तरीय श्रमिक मॅरेथॉन स्पर्धा पार पाडण्यासाठी शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विजय पवार प्रा. हिम्मत साळुंखे क्रीडा शिक्षक सचिन हजारे प्रा.ज्योतिबा हुर्दुखे प्रा. अरुण बेहेरे प्रा. कामाजी नायकुडे प्रा.डॉ. जगन्नाथ ठोंबरे प्रा. मिलिंद पवार प्रा. राजगुरू सर प्रा. डॉ.काकासाहेब घाडगे व संस्थेतील अनेक शिक्षकानी परिश्रम घेतले.