सयाजीराजे पेंट्स शाखा जवळे येथे लकी ड्रॉ सोडत संपन्न.

जवळे(वार्ताहर) सयाजीराजे पेंट्स आणि गणेश कलर वर्ल्ड शाखा जवळे व घेरडी यांच्या व निपॉन पेंट्स तसेच महाराष्ट्र पेंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या लकी ड्रॉ सोडत कार्यक्रम बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सयाजीराजे पेंट्स शाखा जवळे येथे मा.आ. दीपक आबा साळुंखे-पाटील,श्री.तात्यासाहेब केदार-सावंत तसेच निपॉन पेंट्सचे बिझनेस हेड श्री.राहुलजी पांडे, तसेच निपॉन पेंटचे डिस्ट्रीब्युटर्स श्री.अभिजीत सातारकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांक श्री.सचिन बदडे यांना सुझुकी अक्सेस स्कुटी,द्वितीय क्रमांक श्री. बबन केदार-सावंत यांना अँड्रॉइड एलईडी टीव्ही,तृतीय क्रमांक श्री.अभिजीत पवार यांना कुशन सोफा,चतुर्थ क्रमांक कृष्णाली पोळ यांना आटा चक्की देऊन गौरवण्यात आले.
तसेच सरप्राईज गिफ्ट म्हणून चार यशस्वी ग्राहकांना दोन मिक्सर व दोन कुकर भेट देण्यात आले.
व इतर सहभागी ग्राहकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा दिल्या.तसेच सयाजीराजे पेंट्स आणि गणेश कलर वर्ल्ड यांच्यावतीने ग्राहकांसाठी अशाच नव नवीन ऑफर पुढील काळात राबविण्यात येतील असे सांगितले.