सांगोला तालुका

सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास यशस्वी व्हाल-अनंत कुलकर्णी.

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल, प्राथमिक विद्यालय,पूर्व प्राथमिक व बालक मंदिर यांच्या स्नेहसंमेलनास सुरूवात.
सांगोला(प्रतिनिधी):- विद्यार्थ्यांनी खेळाची आवड जोपासावी, वाचन करावे, महापुरुषांची चरित्रे वाचून प्रेरणा घेऊन वाटचाल करावी. सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास आपण नक्कीच यशस्वी व्हाल असे प्रतिपादन सांगोला पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी केले.
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल,  प्राथमिक विद्यालय,पूर्व प्राथमिक व बालक मंदिर यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आज पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात कला व विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ पार पडला.कला प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस निरीक्षक कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते तर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्था कार्यकारिणी सदस्य श्री.दि.धों.जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.तत्पूर्वी मान्यवरांच्या  हस्ते कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सांगोला नगरपरिषदेचे लेखापाल विजय कन्हेरी,श्री.गंगाधरे, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार श्री. शं.बा.सावंत, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कु.सरिता कापसे मॅडम, प्राथमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक श्री.उदय बोत्रे, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी व्हटे मॅडम,बालक मंदिरच्या सविता देशमाने मॅडम,इंग्रजी माध्यमाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.संतोष बेहेरे मराठी माध्यमाचे विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख चेतन कोवाळे,इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी प्रतिनिधी कु. ओंकार पवार, विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. रिंकू पवार तसेच मराठी माध्यमातील विद्यार्थी प्रतिनिधी कु. सौरव दिघे,विद्यार्थीनी प्रतिनिधी कु. गीताई घोंगडे इ. उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. कुलकर्णी यांनी कला व विज्ञान प्रदर्शनातील सहभागी विद्यार्थ्यांचे निर्मिती कौशल्य व सादरीकरणाचे कौतुक केले. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या सर्वकष व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणारी ही संस्था आहे हे सांगत व्यवस्थापनाचे कौतुक केले.सदर विज्ञान व कला प्रदर्शन यशस्वीपणे राबविणेकामी  इंग्रजी माध्यमाचे विज्ञान विभाग प्रमुख श्री. प्रशांत बुरांडे, सुकेशनी सोंडकर मॅडम, मराठी माध्यमाचे प्रमुख श्री. नानासाहेब घाडगे व दत्तात्रय कांबळे तसेच कलाविभाग प्रमुख कु. पल्लवी थोरात, श्री. समाधान शिंदे, मेहराज मण्यार यांनी विशेष परिश्रम घेतले.विज्ञान प्रदर्शनासाठी श्री.यतिराज सुरवसे व श्री.उत्तम बेहेरे  यांनी तर कला प्रदर्शनासाठी कु. कविता पाटील व शिवभूषण ढोबळे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  श्री.जगन्नाथ साठे यांनी केले.
दुपारच्या सत्रात सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय, पूर्व प्राथमिक व बालक मंदिर यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सदस्या सौ. शीलाकाकी झपके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नाझरा विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. अमोल गायकवाड उपस्थित होते. या कार्यक्रमात  विद्यार्थ्यांनी अतिशय बहारदार नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीते, कोळीगीते,शेतकरी गीते, शिवराज्याभिषेक, आई-वडिलांचे महत्त्व, पोवाडा इ. नृत्याविष्कार सादर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.समाधान शिंदे व मेहराज मण्यार यांनी केले.या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून शुभांगी कवठेकर, मृणाल राऊत व राठोड मॅडम यांनी काम पाहिले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी माध्यमाचे सांस्कृतिक विभाग श्री. चेतन कोवाळे सर यांच्या सह  दोन्ही माध्यमाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांनी लक्षवेधी उपस्थिती दर्शवली.

आज दिनांक 2डिसेंबर 2022 रोजी सकाळच्या सत्रात फनी गेम्स व फुडस्टॉलचे उद्घाटन सांगोल्यातील प्रसिद्ध डॉक्टर श्री.अनुप तोरणे यांच्या शुभहस्ते तर संस्थासचिव श्री.म.शं.घोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तर दुपारी 1वाजता सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!