सांगोला तालुका

*मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासह बायपास रस्त्याच्या कामांची निविदा प्रसिद्ध **

मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासह बायपास रस्त्याच्या कामांची निविदा प्रसिद्ध
मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासाठी १४ कोटी.
बायपास रस्त्यासाठी ११कोटी.

 

सांगोला:-सांगोला तालुक्यातील विविध कार्यालय एकाच ठिकाणी व्हावीत जेणेकरून नागरिकांचे आल्यानंतर सर्व कामे एकाच ठिकाणी व्हावीत नागरिकांचा वेळ वाचावा म्हणून आमदार शहाजीबापू पाटील यांनी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नाला यश आले असून सांगोला येथील कोर्टासमोर मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय होणार असून निविदा प्रसिद्ध झाली आहे या कामासाठी तब्बल १४ कोटी इतका निधी मिळाला आहे त्याच बरोबर सांगोला शहराच्या विकासामध्ये भर पडणारा असून या बायपास रस्तामुळे मुळे सांगोला शहराच्या वाहतूक कोंडी दूर होऊन वाहतूक सुरळीत होणार आहे बायपास रस्त्यासाठी सुद्धा ११कोटी रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे या दोन कामामुळे सांगोल्या मध्ये येणाऱ्या नागरिकांची सोय होणार असून प्रवासासाठी बायपास रस्ता सोयीस्कर होणार असून एकाच ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय झाल्याने नागरिकांचा वेळ बचत होणार आहे लवकरच या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सदरची कामे चालू होतील सांगोला विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामे वेगाने पूर्ण केली जातील या साठी शिंदे -फडणवीस सरकार कडून निधी कमी पडू दिला जाणार नाही असे यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!