कोळा(वार्ताहार): सांगोला तालुका पावसाळी क्रीडा स्पर्धा सन 2024- 25 अंतर्गत हिंदकेसरी आखाडा बामणी येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या. येथील स्पर्धेत कोळा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील खेळाडूंनी वेगवेगळ्या वजन गटात क्रमांक मिळवले व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली त्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सांगोला तालुका गणित अध्यापक मंडळाच्या उपाध्यक्षपदी श्री जगन्नाथ पांडुरंग माने सर व सी.टी.ई. टी.परीक्षा उत्तीर्ण तांबोळी मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.
14 वर्ष फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत अक्षयकुमार नरळे 41 किलो वजन गटात प्रथम क्रमांक,कुलदीप नरळे 54 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक,
17 वर्ष फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये अल्ताफ पटेल 48 किलो वजन गटात प्रथम क्रमांक,
17 वर्ष ग्रीको रोमन कुस्तीमध्ये एकलव्य सरगर 43 किलो वजन गटात प्रथम क्रमांक, रेहान तांबोळी 51 किलो वजन गटात प्रथम क्रमांक, प्रज्योत कदम 51 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक,
19 वर्ष ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेमध्ये अण्णा सरगर 67 किलो वजन गटात प्रथम क्रमांक, संजोग ठोकळे 55 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक,
त्यानंतर मुलींनीही कुस्ती स्पर्धेमध्ये सुयश संपादन केले. त्यामध्ये 19 वर्ष फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेमध्ये संजना हातेकर 62 किलो वजन गटात प्रथम क्रमांक, दीक्षा मोरे 64 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक,
14 वर्षे फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये अक्षदा करांडे 44 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक संपादन करून घवघवीत यश संपादन केले.
वरील सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक सुनील माळी सर व प्रा.अंकुश सरगर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थाध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके सर, सचिव म.शं.घोंगडे सर, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेशजी झपके साहेब व सर्व संस्था कार्यकारणी सदस्य, प्राचार्य श्रीकांत लांडगे सर, पर्यवेक्षक चारुदत्त जगताप सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.