व्यसनरुपी अंधकार आपल्या आयुष्यातून हद्दपार होऊ दे आणि प्रकाश रुपी जीवनाची वाट दिसू दे- डॉ.संदीप तांबारे

आयुष व्यसनमुक्ती केंद्रात कुटुंब मेळावा संपन्न!

बार्शी(वार्ताहर):-व्यसनातून बाहेर येण्यासाठी उपचार पद्धती मधील एक भाग म्हणजे कुटुंब समुपदेशन. ज्याला शास्त्रीय भाषेत सायको एज्युकेशन असे म्हटले जाते. वेगवेगळ्या पातळ्यावर समाजाचे, व्यसनी व्यक्तीच्या अवतीभवती असणार्‍या व्यक्तींचे, कुटुंबीयांचे ही प्रबोधन केले जाते.व्यसनरुपी अंधकार आपल्या आयुष्यातून हद्दपार होऊ दे आणि प्रकाश रुपी जीवनाची वाट दिसू दे असे विचार आयुष्य केंद्राचे प्रमुख संदीप तांबारे यांनी व्यक्त केले.

आयुष व्यसनमुक्ती केंद्रातील कुटुंब मेळाव्यामध्ये तीस दिवसाचा उपचार पूर्ण करून घरी जाणार्‍या परिवर्तनवादी मित्रांच्या व कुटुंबातील सदस्यांचा मेळावा काल रविवारी आयुष्य केंद्राच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी परिवर्तन वादी मित्रांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. रुग्ण मित्रांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .यावेळी प्रमुख पाहुणे लालखोलेन साहेब, दैनिक माणदूत एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक विनायक मस्के, उपस्थित होते. यावेळी डॉ. संदीप तांबारे यांनी उपस्थित कुटुंबीयांना मार्गदर्शन केले व व्यसनमुक्तीच्या या लढ्यात आपण सगळे सामील झालात याबद्दल धन्यवाद दिले.

 

यावेळी आयुष व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार पूर्ण करून जे मित्र घरी जाणार आहेत त्यांचा सत्कार झेप पुस्तिका व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. तसेच व्यसन मुक्तीच्या या प्रवासात पेशंट 6 महिने उपचारामध्ये असतो. दर महिन्याला फॉलोअपला येणार्‍या पेशंटचाही सत्कार आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.संदीप तांबारे यांच्या हस्ते करण्यात आला.

यानंतर आई-वडिलांचे पूजन करून घरी जाणार्‍या परिवर्तनवादी मित्रांनी त्यांचे ऋण व्यक्त केले व इथून पुढे निर्व्यसनी आयुष्य जगण्याचे आश्वासन दिले .फोलोअपला आलेला पेशंट खर्‍या अर्थाने व्यसनावरील उपचार घेऊन बाहेर पडल्यावर निर्व्यसनी आयुष्य जगण्याचे आव्हान कसे पेलतो ? याविषयी आपले अनुभव शेअर केले. यावेळी बीड हून आलेले संतोष मोराळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगतामध्ये त्यांनी मृत्यूच्या दाढेतून परत आल्यानंतर आयुष व्यसनमुक्ती केंद्राने आपल्याला जीवनदान दिल्याचे मत व्यक्त केले.

व्यसनाने त्रस्त कुटुंबियातील स्त्री सदस्यांचे समुपदेशन करण्यात आले.मनोबल वाढवण्यासाठी तसेच त्यांना काही वैवाहिक टिप्स देत सहचरणी गट आयुष व्यसनमुक्ती केंद्राच्या कुटुंब समुपदेशक सोलापूरहून आलेल्या मृणालिनी मोरे मॅडम यांनी हा गट घेतला. तर कुटुंबातील लहान मुलांना मनोरंजन पर खेळ घेत, अंकुर गट घेण्यात आला. आयुष व्यसनमुक्ती केंद्र चे मॅनेजर गणेश तांबारे सर उपस्थित होते.

या कुटुंब-पालक मेळाव्यासाठी व्यसनमुक्ती केंद्राच्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधू शिनगारे व अश्विनी कुंभार तसेच शरद तुपेरे सर , स्वप्निल जाधव सर,सागर शिंदे सर यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहित गोरे ,सुजित ढेकळे, प्रशांत शेंडगे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button