नाझरा विद्यामंदिर प्रशालेच्या वतीने “हर घर तिरंगा” बाबत प्रबोधन रॅली संपन्न

नाझरा(वार्ताहर):- भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सलग तीन दिवस स्वातंत्र महोत्सव साजरा करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या घरावरती दिनांक 13 ऑगस्ट सकाळी सात वाजल्यापासून पासून 15 ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे.
नाझरा परिसरातील सर्व ग्रामस्थांना हर घर तिरंगा या अभियानाची माहिती व्हावी म्हणून नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने हर घर तिरंगा प्रबोधन रॅली काढण्यात आली होती. आपल्या भारताचा ध्वज आपल्या घरावरती मानाने डौलावा तिरंगा बाबत आपल्या सर्वांच्या मनामध्ये स्वाभिमान निर्माण व्हावा त्याचबरोबर देश प्रेम जागृत राहावे यासाठी या प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी हातामध्ये तिरंगा घेऊन भारत माता की जय,भारताचा स्वातंत्र्य दिन चिरायू होवो,जय जवान जय किसान,जय जवान जय विज्ञान, झाडे लावा झाडे जगवा अशा प्रकारच्या प्रबोधनात्मक घोषणा देत “हर घर तिरंगा” या अभियानाबाबतचे प्रबोधन विद्यार्थ्यांनी केले.गावात असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना भेटून हर घर तिरंगा चे महत्व विशद केले.नाझरा ग्रामपंचायतीसमोर सदर प्रबोधन रॅलीचे ग्रामपंचायत सदस्य सुमित्रा लोहार,शशिकांत पाटील युवा नेते संजय सरगर व पोपट खरात,बंडू काकडे यांच्याकडून स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रबोधनाबाबत सरपंच मंदाकिनी सरगर यांनी कौतुक केले, त्याचबरोबर नाझरा परिसरातील ग्रामस्थांनाही ग्रामपंचायतच्या वतीने हर घर तिरंगा लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्राचार्य बिभीषण माने यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, मारुती सरगर,अतुल बनसोडे, प्रा. युवराज लोहार,मोहन भोसले व क्रीडा शिक्षक स्वप्निल सासणे, सिद्धेश्वर काळे यांनी या प्रबोधन रॅलीचे उत्कृष्ट आयोजन केले होते.त्यानंतर प्रशालेत वसुंधरा बचाव च्या संदर्भात असणारी शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. आपला भारत देश स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन हरित सेना विभागाचे प्रमुख सोमनाथ सपाटे यांनी केले.