बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नोकरी महोत्सवाचे आयोजन करून शेकडो कुटुंबांचे संसार उभे करण्याचा प्रयत्न आमदार शहाजीबापूंनी केला आहे. यामुळे आमदार शहाजीबापूंच्या संकल्पनेतून शेकडो तरुणांच्या आई वडिलांचे स्वप्न साकार होणार आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळवण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागत आहेत. मतदारसंघातील आ.शहाजीबापूंचे काम पाहून समाधान वाटले आहे. भविष्यकाळात एकही सुशिक्षित पदवीधर बेरोजगार राहणार नाही यासाठी बेरोजगारांना तालुक्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न करावा. विकास कामांच्या जोरावर शहाजीबापू तुमचा विजय पक्का आहे असा विश्वास नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख तथा सांगोला विधानसभा निवडणूक प्रभारी विजय चौगुले यांनी व्यक्त केला.
राजर्षी शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, चिकमहुद यांच्या वतीने तसेच आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संकल्पनेतून सांगोल्यात रविवार ११ ऑगस्ट रोजी इयत्ता पाचवी ते पदवी पर्यंतचे शिक्षण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सव संपन्न झाला. या नोकरी महोत्सवात ७८५ बेरोजगार तरुणांनी नोदणी केली होती. मुलाखती नंतर ३४५ तरुणांना ऑन दि स्पॉट नोकरीचे पत्र देण्यात आले. त्यांना १५ हजारांपासून ४० हजारांपर्यंत प्रती महिना वेतन मिळणार आहे.
यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, हिम्मत दाखवली तर तालुक्याचा दुष्काळ हटवून सुजलाम सुफलाम तालुका होऊ शकतो हे पाच वर्षात सिद्ध करून दाखविले आहे. सर्वच सिंचन प्रकल्पाचे पाणी सांगोल्याला मिळत असल्याने तालुक्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहिले नाही. पाच वर्षात रस्ते, पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. राजकारण करीत असताना समाजसेवेचा हेतू प्रामाणिक स्वच्छ असल्याने शासनाचा पैसा विकास कामासाठी तळागाळापर्यंत पोहोचला आहे, असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, युवा नेते दिग्विजय पाटील, धनंजय काळे, दादासाहेब लवटे, सागर पाटील, दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे, प्रीतीश दिघे, प्रा.संजय देशमुख, समीर पाटील, आनंदा माने, शिवाजी घेरडे, मुबिना मुलाणी, राणी माने, छाया मेटकरी, अप्सरा ठोकळे, अस्मिर तांबोळी, ज्ञानेश्वर तेली, अभिजीत नलवडे, सुभाष इगोले, दादासाहेब वाघमोडे, अजिंक्य शिंदे, सोमेश यावलकर, शिवाजीराव बाबर, जगदीश पाटील, धनजंय बागल, सत्यवान मोरे, विजय इंगोले, दीपक ऐवळे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.