सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस ,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या महाविद्यालयामध्ये डॉ. रंगनाथन यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . ग्रंथालय शास्त्राचे आद्य प्रवर्तक म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन यांना ओळखले जाते. १२ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करतात. भारताला ग्रंथालय क्षेत्रात जागतिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या डॉ. रंगनाथन यांचा ग्रंथालयाच्या विकासात मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची दारे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथन यांनी रुजवला. तो जोपासण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य झिजवले, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.आर.बी शेंडगे यांनी केले.
यावेळी बोलताना ग्रंथपाल सुधीर माळी म्हणाले, ‘डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्म १२ ऑगस्ट १९८२ रोजी तत्कालीन मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यातील शियाली गावात झाला. १९३०च्या दशकात डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्राचे कोलन क्लासिफिकेशन, क्लासिफाइड कॅटलॉग कोड, प्रोलेगोमिना टू लायब्ररी क्लासिफिकेशन, थिअरी ऑफ लायब्ररी व रेफरन्स सर्व्हिस अँड बिब्लिओग्राफी या पाच सूत्रमय ग्रंथांचे लेखन व प्रकाशन करून ते दशक विशेषत्वाने क्रांतिकारी ठरवले. १९३१मध्ये प्रथम मद्राससाठी ‘लायब्ररी बिल’ तयार केले. ग्रंथालयशास्त्रातील प्रमाणपत्र, तसेच पदविकास्तरातील अभ्यासक्रमाचे प्रारूप तयार केले आणि ग्रंथालयशास्त्र शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर मा. डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले, आय.क़्यु ए.सी चे समन्वयक डॉ. वागीशा माथाडा, प्रा.शरद आदलिंगे, एन.एस.एस.चे कार्यक्रम आधिकारी प्रा. राहूल पाटोळे, प्रा.राजकुमार गावडे, फार्मसी कॉलेजचे प्रा.अमोल पोरे ,प्रा.चैताली धुमाळ, प्रा.अनघा येलपले प्रा.जगदाळे तसेच सर्व विभागाचे विभागप्रमुख यांच्या सह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.