फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कुस्ती क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केले. सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सांगोला तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच हिंदकेसरी आखाडा बामणी येथे दिनांक 7 ऑगस्ट रोजी नुकत्याच तालुकास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धा ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा पार पडल्या.
त्यामध्ये फॅबटेक पब्लिक स्कूल मधील इयत्ता दहावीतील विराज जगताप याने 92 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तर ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता अकरावीतील आकाश इरकर या विद्यार्थ्याने 65 किलो वजनी गटामध्ये, इयत्ता बारावीतील आशिष जगताप 62 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेकरता निवड झाली आहे. शाळेतील क्रीडा शिक्षक श्री पंचाक्षरी स्वामी यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.
शाळेचे प्राचार्य श्री. सिकंदर पाटील, ए.ओ.वर्षा कोळेकर, सुपरवायझर वनिता बाबर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
फॅबटेक संस्थेचे चेअरमन माननीय श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, शाळेचे प्राचार्य श्री.सिकंदर पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.