भारतीय विद्यापीठ आयोग संलग्न सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांनी घेतलेल्या 7 एप्रिल 2024 च्या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जूनोनीचे शिक्षक श्री आनंदा भगवान बामणे हे शिक्षणशास्त्र विषयांमध्ये सेट पात्रता परीक्षा पास झाले आहेत.
28 वर्षाच्या आपल्या प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांनी अनेक शैक्षणिक पदव्या प्राप्त केलेल्या आहेत. गुणापवाडी तालुका सांगोला या आपल्या मूळच्या गावी आपल्या नोकरीची नऊ वर्ष सेवा करताना त्यांनी जिल्हा परिषद शाळेतील अतिशय उत्कृष्ट पायाभरणी करून ग्रामीण भागातील शाळा त्यावेळच्या शंकरराव मोहिते पाटील गुणवत्ता विकास अभियान अंतर्गत जिल्हास्तरावरील अभियानामध्ये नावलौकिक केला होता. गुनापवाडी गावात नोकरी करत असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून आज चांगले ठिकाणी त्यांचे विद्यार्थी आपली सेवा बजावत आहेत . विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मार्गदर्शन कला, क्रीडा अशा विविध गुणांचा विकास करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यानंतर जुजारपूर येथे त्यांनी आपल्या नोकरीची 14 वर्षे सेवा केली जूजारपूर शाळेमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवून अनेक विद्यार्थी चांगले ठिकाणी आज नोकरी करत आहेत . जुजारपूर गावच्या शाळेचा कायापालट होण्यामध्ये बामणे सरांचा खूप मोलाचा वाटा आहे. सध्या ते जुनून येते कार्यरत असून एक वर्षापासून आपली तिथे सेवा देत आहेत .सरांना नवीन गोष्टी शिकण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे त्यांच्या अंगी सांस्कृतिक वारसा, स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध अंगी कलागुणांचा वास आहे. धनगरी गजी नृत्यामध्ये ढोल वाजवणे हा सरांचा आवडता छंद आहे. शिकू आनंदे या नावाने त्यांचे शैक्षणिक अध्ययन – अध्यापन व्हिडिओ निर्मितीचेyoutube चॅनल पाच वर्षापासून सोशल मीडियावर कार्यरत आहे
नवीन नवीन स्पर्धा परीक्षा देणे आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्याचा छंद असल्यामुळे सरांनी 7 एप्रिल 2024 रोजी शिक्षण शास्त्र या विषयांमधून महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा दिली होती .या परीक्षेमध्ये सरांनी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. सरांच्या या यशाबद्दल जुजारपूर गावचे सरपंच श्री काकासाहेब पाटील उपसरपंच श्री पवन गाडे तसेच माजी उपसरपंच चंद्रकांत (फंटू) बजबळे ,श्री विजय बजबळे चेअरमन श्री तुकाराम पाटील( सेठ) यांनी सरांचे अभिनंदन केले. गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले शिक्षण विस्तार अधिकारी अमोल भंडारी, केंद्रमुख श्री अप्पासाहेब पवार जुनोनी शाळेचे मुख्याध्यापक श्री विकास वाघमारे सर यांनी सरांचे अभिनंदन केले . जुनोनी शाळेतील सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सचिन पाटील व उपाध्यक्ष श्री प्रवीण तवटे , माजी ध्यक्ष श्री सुभाष व्हनमाने सर यांनी सरांचा सत्कार केला आणि त्यांना अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे. एन. केंगार सर यांनीही सरांचा सत्कार करून अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या .हातीद केंद्रातील सर्व शिक्षक, सांगोला तालुक्यातील त्यांचे मित्रपरिवार , सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांनी सरांचे अभिनंदन केले. गुनापवाडी गावचे शेतकरी नेते श्री दत्तात्रय दामोदर माने ,रंगराव माने ,जयवंत वाघमोडे युवा नेते मायाप्पा वाघमोडे , सिव्हिल इंजिनियर गुलाब माने, उद्योगपती सचिन माने यांनी गुरुजींचे अभिनंदन आणि सत्कार केला.